द परफेक्ट शॉट

Read in English

वर्ष १९९४. सण बहुधा दिवाळी—भाऊबीज—असावा. आम्ही सगळे भाऊ-बहीण, मामा-मावशी संध्याकाळी एकत्र जमलो होतो. एक छान संध्याकाळ होती आणि we were having a great family get-together. दूरदर्शनवर दर बुधवारी येणारा “चित्रहार” हा आमचा आवडता कार्यक्रम. १९९०च्या दशकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे VCR—video cassette recorder. बरेचदा आम्ही “चित्रहार”मधील गाणी VCRवर record करत असू.

मी आणि माझा मावसभाऊ—आम्ही दोघेही त्या वेळच्या एका Bollywood newcomerचे प्रचंड fans!

आमच्या cousinsच्या गप्पागोष्टी आणि typical नागपुरी “चकल्लस” सुरू असताना आम्हाला एक भन्नाट कल्पना सुचली! Videoconचा रंगीत TV, VCR आणि Kodakचा color camera समोरच होता. आम्हा दोघांनाही वाटले, we’ll capture a perfect picture on VCR-TV—एक सुवर्णसंधी to brag about our true fan moment!

बऱ्याच गोंधळानंतर आणि अनेकदा VCR pause, play, rewind, forward, pause—repeat केल्यानंतर बहिणीने आम्हाला आश्वस्त केले, “ही frame, the expressions, तुम्ही दोघे बाजूला—हा फोटो will come just wow! Perfect!” आम्हाला वाटले, we really have pulled off something very innovative for that time. “क्लिक”चा आवाज आला आणि शेवटी हा सगळा गोंधळ आम्ही आवरता घेतला.

सगळ्यांनाच तो “परफेक्ट शॉट” पाहायची उत्सुकता होती; पण कॅमेऱ्यात अजूनही काही फोटो बाकी होते. तो roll संपेपर्यंत वाट पाहण्याशिवाय काय करणार!

Finally, आठवडाभरात roll develop झाला.

आज, ३२ वर्षांनंतर, त्या “फोटो”चा “फोटो” तुमच्यासमोर पोस्ट करत आहे—फोटोमध्ये capture झाली होती एक complete blank TV screen!

आम्ही cousins एकत्र भेटलो की या प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय कुठल्याही गप्पागोष्टी पूर्ण होत नाहीत. मध्यंतरी नागपूरला गेलो तेव्हा बऱ्याच वर्षांनी we tried to recreate this photo shot; पण लगेच लक्षात आले—Original is Original!

काही क्षण आठवताना प्रत्येक वेळी चेहऱ्यावर स्मित देऊन जातात. त्या “(इम)परफेक्ट शॉट”च्या एका “क्लिक”ने आम्हा सगळ्यांना वर्षानुवर्षे निखळ आनंद दिला आहे—ज्यात आम्ही भिजून जातो, आजही!

Happiness is a State of Mind! आंतरराष्ट्रीय आनंद दिन—२० मार्च २०२६—यानिमित्ताने.

प्रतिसाद

प्रतिक्रिया व्यक्त करा