अनुभूती—एक सिनेमाची

Read in English

मागच्या महिन्यात “धुरंधर-२” हा सिनेमा बघितला. हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. आज सहज लिहायला बसलो आणि “मनातले तरंग”ची ही raw आवृत्ती उमटली. एखादा सिनेमा आपल्याला स्वतःकडे बघायला लावू शकतो का? नक्कीच!

प्रकरण १

या सिनेमात पाच मध्यवर्ती मुद्दे मांडले आहेत. पहिले दोन मुद्दे अगदी स्पष्ट आणि ठळक आहेत: १. देशभक्ती—patriotism आणि २. कुटुंब—Family First. पण त्याचबरोबर ३. त्याग—sacrifice, ४. दुःख, शोक—sorrow, loss and grief आणि ५. व्यक्तीची मूळ ओळख—core identity of an individual—यांसारखे सूक्ष्म विषय हा सिनेमा ज्या पद्धतीने समोर आणतो, त्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. प्रत्येकाचे या भावनांशी वेगळे नाते असते. या भावनांशी जोडलेले माझ्या आयुष्यातील काही क्षण आज तुमच्यासोबत शेअर करत आहे.

प्रकरण २

मला IT consulting क्षेत्रात येऊन जेमतेम एक वर्ष झाले असेल. सोमवारी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे State College, Pennsylvania येथे Marriott Hotelमध्ये check-in केले. त्या वर्षी Marriottमध्ये ७५ रात्री पूर्ण झाल्यामुळे मला Jacuzzi Suiteमध्ये upgrade करण्यात आले. तो क्षण होता, जेव्हा मला जाणवले—घरापासून आणि कुटुंबापासून दूर राहिलेल्या ७५ रात्रींची किंमतच मी मोजत होतो. त्या रात्री Jacuzzi Suiteमध्ये मी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने एकटा होतो.

प्रकरण ३

अनेक वर्षे professional consultingमध्ये काम करताना मी शिकलेल्या सर्वोत्तम तत्त्वांपैकी एक तत्त्व नंतर वैयक्तिक आयुष्यात वापरले—प्रत्येक आव्हानात आत्मपरीक्षण करणे.

दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी माझी पहिली marathon पूर्ण केली, तो क्षण आनंदाचाही होता आणि अंतर्मुख करणाराही. कारण हा तो काळ होता, जेव्हा आयुष्य नव्याने सुरू करण्याची गरज होती. माझा अनुभव असा आहे की व्यक्ती जेव्हा खऱ्या अर्थाने एकांतात असते, तेव्हा “मी कोण आहे?” या मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. By looking inwards, आपली नव्याने ओळख करून घेऊन, एका नव्या उद्देशाने सुरू होणारा हा प्रवास स्वीकारण्यासाठी मनाला train करावे लागते. आयुष्यातले काही नवे प्रवास प्रथम स्वीकारावे लागतात; त्यांच्यातला आनंद मात्र नंतर हळूहळू सापडतो. आणि हे सगळे कृतज्ञतेने जगायला शिकावे लागते.

अंतिम प्रकरण ४

हा सिनेमा काळजाला भिडतो; कारण त्यातील कुठलीही व्यक्तिरेखा आपली सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, आणि अलगदपणे आपण त्यांच्या प्रवासाशी जोडले जातो.

खरे तर उद्या समजा या सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यातील हिंसाचार वगळून तो पुन्हा नव्याने प्रदर्शित केला, तरीही हा सिनेमा मोठ्या प्रेक्षकवर्गात यशस्वी ठरेल, यात शंका नाही.

ज्या वाचकांनी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी—यातील भावस्पर्शी संगीत, गोष्ट आणि अभिनय आजही जगभरातील प्रेक्षकांशी एक भावनिक नाते जोडत आहेत.

या सिनेमातील कोणता क्षण किंवा विचार तुमच्या मनाला सर्वाधिक भिडला?

(My) Post Credits

भगवद्गीतेतील १८वा अध्याय, श्लोक ६६.

श्लोकाचे सार: हा श्लोक पूर्णपणे शरणागती—surrender—आणि निःस्वार्थ भक्ती शिकवतो. अहंकार सोडून, ईश्वरावर विश्वास ठेवून काम करत राहणे आणि परिणामांची काळजी न करणे.

माझ्या मराठी लेखनाची प्रेरणा असलेल्या माझ्या बहिणीचे मनापासून आभार!

प्रतिक्रिया व्यक्त करा